Warning: ksort() expects parameter 1 to be array, object given in /home/wardha/wardhaniyojan.in/wp-content/plugins/bbpress/includes/core/template-functions.php on line 316
जिल्हा नियोजन समिती , जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा | District Planning Office | Collector Office | Wardha | wardhaniyojan.in – जिल्हा नियोजन समिती , जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा | District Planning Office | Collector Office | Wardha | wardhaniyojan.in
Slide backgroundSlide thumbnail

जिल्हा नियोजन समिती

                 

 जिल्हा हा नियोजनाचा पायाभूत घटक मानून प्रत्येक जिल्ह्याकरिता यथार्थदर्शी वार्षिक योजना तयार करण्यासाठी जिल्हा स्तरावर सुयोग्य नियोजन यंत्रणा निर्माण करण्याचा निर्णय शासनाने १९७४ मध्ये घेऊन प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा नियोजन व विकास मंडळाची स्थापना केली होती. संविधानाच्या ७४ व्या घटना दुरुस्तीतील अनुच्छेद २४३ झेडडी नुसार राज्यातील सर्व जिल्ह्यात (अनुसूचित क्षेत्र वगळून) जिल्हा नियोजन समित्या स्थापन करण्याबाबतचा सन १९९८ चा महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती (रचना व कामे), अधिनियम क्र. २४ महाराष्ट्र शासन राजपत्र-असाधारण दि. ०९ ऑक्टोबर, १९९८ द्वारे प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा अधिनियम शासन अधिसूचना, नियोजन विभाग क्र. जिनिस १०९८/प्र.क्र.९३ का.१४४४ दि. ०९ मार्च, १९९९ द्वारे दि. १५ मार्च, १९९९ पासून अंमलात आणला आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा नियोजन समिती स्थापन करण्यात आलेल्या असून जिल्ह्यात १९७४ पासून अस्तित्वात असलेली जिल्हा नियोजन व विकास मंडळे व त्यांच्या कार्यकारी समित्या व उपसमित्या शासन निर्णय नियोजन विभाग दि. १२ मार्च, १९९९ अन्वये दि. १५ मार्च, १९९९ पासून बरखास्त करण्यात आलेल्या आहेत.

                 जिल्हा नियोजन समित्या स्थापन करण्याबाबतच्या महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती (रचना व कामे) अधिनियम २४ मधील कलम ३ च्या पोटकलम (२) मध्ये तरतुद केल्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्हा नियोजन समिती अस्तित्वात आहे. जिल्हा नियोजन समितीची रचना व कार्यपध्दती महाराष्ट्र शासन, नियोजन विभाग, शासन निर्णय क्र.जिनिस-१०९९/प्र.२९/का.१४४४ दि.०१ जून, १९९९ अन्वये निश्चित करण्यात आलेली आहे.

जिल्हा नियोजन समितीची रचना व कार्यपद्धती

जिल्हा नियोजन समितीची कार्ये

जिल्हा नियोजन समितीच्या बैठका 

Close