आमदार स्थानिक विकास कार्यक्रम

धलोकोपयोगी लहान कामांचा कार्यक्रमध राज्यात १९८४-८५ या वित्तीय वर्षापासून राबविण्यात येत आहे. सन १९९०-९१ मध्ये या कार्यक्रमाचे नामाभिधान धस्थानिक विकास कार्यक्रमध असे करण्यात आले. सन १९९६-९७ पासून या कार्यक्रमाचे नाव धआमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रमध असे बदलण्यात आले.

कार्यक्रमाचा उद्देश

जिल्हा वार्षिक योजना राबवितांना निधी अभावी किंवा योजनेतील प्राथम्यक्रमा अभावी जी लहान-लहान लोकोपयोगी कामे मागे राहतात अशी कामे स्थानिक लोकप्रतिनीधींना सुचविता येणे तसेच या कार्यक्रमांतर्गत शासनाची स्थायी स्वरुपाची मालमत्ता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

अनुज्ञेय निधी

प्रत्येक विधानसभा सदस्य व विधानपरिषद सदस्यांना त्यांच्या मतदार संघात विकास कामे घेण्यासाठी दरवर्षी २००.०० लक्ष तरतुद उपलब्ध असते.

आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाची सुधारीत सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना नियोजन विभागाकडील शासन निर्णय क्र. स्थाविका २०११/प्र.क्र.४७/का.१४८२ दि. १३ सप्टेंबर, २०११ अन्वये निर्गमीत करण्यात आलेल्या आहेत. सदरची मार्गदर्शक तत्वे महाराष्ट्र शासन या संकेतेस्थळावर उपलब्ध आहेत.

Close