खासदार स्थानिक विकास कार्यक्रम

खासदार स्थानिक विकास कार्यक्रम हा केंद्ग पुरस्कृत कार्यक्रम आहे. सदर कार्यक्रमाची सुरउवात फेब्रुवारी, १९९४ मध्ये झाली.

कार्यक्रमाचा उद्देश

निधी अभावी किंवा योजनेतील प्राथम्यक्रमा अभावी जी लहान-लहान लोकोपयोगी कामे मागे राहतात अशी कामे स्थानिक लोकप्रतिनीधींना सुचविता येणे तसेच या कार्यक्रमांतर्गत शासनाची स्थायी स्वरुपाची मालमत्ता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

अनुज्ञेय निधी

प्रत्येक लोकसभा व राज्यसभा सदस्यांना त्यांच्या मतदार संघात विकास कामे घेण्यासाठी दरवर्षी ५००.०० लक्ष तरतुद उपलब्ध असते.

खासदार स्थानिक विकास कार्यक्रमाची सुधारीत सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना केंद्ग शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय, यांनी दि. १५ मे, २०१४ रोजी निर्गमीत केलेल्या आहेत. सदरची मार्गदर्शक तत्वे खासदार स्थानिक विकास कार्यक्रम या संकेतेस्थळावर उपलब्ध आहेत.

Close